‘Bol Pakya’ Song from Wedding Cha Shinema released now

लवकरच वेडिंगचा शिनेमा हा चित्रपटर तुमच्या भेटीस येत आहे. फेब्रुवारी महिना म्हटलं की व्हॅलेंटाइन डे चा आपोआप उल्लेख होतो. प्रियकर किंवा प्रेयसीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असे म्हटले जाते. अश्यातच या चित्रपटातील गाणे सोशल मीडिया वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

 

सलील कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून या गाण्यात पक्याला प्रेमाची कबुली द्यायची आहे . त्याच्या या कामासाठी त्याचा मित्रपरिवार कशी मदत करतो हे या गाण्यात चित्रीत करण्यात आले आहे. वेडिंगचा शिनेमा या चित्रपटातून शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे.

 

Bol Pakya 01

 

“बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या…अरे भीड ना, अरे नड कि, काहीतरी बोल पक्या…” असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात त्याच्या आजूबाजूचे सर्वच त्याला त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याचे सुचवत आहेत. पण पक्याची मात्र ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ हे सांगण्याची हिंमत होत नाही. या परिक्षितीमुळे पक्याची होणारी द्विधा मनस्थिती आपण या गाण्यातून पाहू शकतो. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे गेले असून शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि प्रवीण तराडे यांच्यावर चित्रित झाले आहे.

 

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णीं यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. वेडिंगचा शिनेमा हा चित्रपट १२ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथाही डॉ सलील कुलकर्णीं यांनीच लिहिली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे तर नितीन वैद्य हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.