Baloch : truth behind post Panipat War situation….

‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे . ‘बलोच’ हा चित्रपट चंद्रभागा प्रोडक्शन यांची प्रस्तुती असून जीवन जाधव आणि जितेश मोरे यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे . या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश पवार यांनी केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून पानिपतच्या लढाई नंतरचं सत्य ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.रांजण आणि मिथुन या चित्रपटांच्या दिग्दर्शना नंतर दिग्दर्शक प्रकाश पवार यांचा हा तिसरा चित्रपट आहे.

 

baloch 03

 

‘बलोच’ या चित्रपटात प्रथमच अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या शिवाय विशाल निकम, रोहित आवाळे हे नव्या दमाचे कलाकार देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

 

Baloch 02

 

जून महिन्यात राजस्थान येथे ‘बलोच’ ह्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे .मराठ्यांच्या इतिहासातील मोठी जखम म्हणजे पानिपतचा पराभव, त्या पराभवानंतर आपल्या मावळ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरीत राहावे लागले. या गुलामांची शौर्यगाथा ‘बलोच’ या चित्रपटातून दाखवली जाणार आहे अस या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितले आहे.