‘Atrocity’ upcoming Marathi movie

Atrocity 02

 

हल्ली वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहेत. चित्रपटाच्या माध्यमाने समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचा प्रयत्न केला जातो.असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अॅट्रॉसिटी असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिपक कदम यांनी केलं आहे.

 

या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा देत लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला म्हणाले की, आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच मला आवडत आला असून एक मह्त्त्वपूर्ण विषय रसिकांसमोर येत असल्याचा त्यांना आनंद आहे. आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दिपक कदम यांनी दिग्दर्शन केलं आहे.

 

Atrocity 01

 

या चित्रपटात लेखा राणे, सुरेखा कुडची, कमलेश सुर्वे, शैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असूनबरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत.

 

संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, शशिकांत मुंबारे, सौरभ पी. श्रीवास्तव यांनी या चित्रपटातल्या गीतरचना गायल्या आहेत. आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला अॅट्रॉसिटी १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.