Aniket Vishwasrao and Bhagyashree Mote team up for ‘Majya Baykocha Priyakar’

Majya baykocha priyakar

लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे एक आगळा वेगळा चित्रपट ज्याचे नाव आहे ‘माझ्या बायकोचा प्रियकर’. या चित्रपटाची निर्मिती ‘राजकला मुवीज’ व ‘बाबा मोशन पिक्चर्स’ ह्यांनी एकत्र येऊन केली आहे. चित्रपटाचे नाव थोडे हटके असल्यामुळे सगळयांना या चित्रपटात नक्की काय असेल याची उत्सुकता वाटत आहे.‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या इंटरेस्टीग चित्रपटाच दिग्दर्शन राजीव एस. रुईया ह्यांनी केल आहे. या चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला या चित्रपटाच्या कथेचा लहकास अंदाज नक्कीच आला असेल. कुटुंब ह्या गहन विषयावर भाष्य करणारा हा एक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंजनाचा पुरेपूर वापर आणि मसाला पहावयास मिळणार आहे.

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटात मराठीतील अनेक नावाजलेले कलाकार आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अनिकेत विश्वासराव आणि भाग्यश्री मोटे यांची आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव याना आपण अनेक चित्रपटातुन पहिले आहे. भाग्यश्री मोटे ‘सिया के राम’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांना दिसली. ती सर्वांच्या नजरेत भरली आधीच्या ‘जोधा अकबर’ आणि ‘देवोंके देव महादेव’ या राष्ट्रभाषेतील टेलिव्हिजन मालिकांमधून. तिने मराठीत ‘देवयानी’ मालिकेतील देवयानी साकारली आहे तसंच अगदी अलीकडे ‘प्रेम हे’ या मालिकेत ललित प्रभाकर सोबत दिसली तसंच ‘शोधू कुठे’ मालिकेतील प्रमुख भूमिकेतून ती प्रेक्षकांना सामोरे गेली.

अनिकेत विश्वासराव आणि भाग्यश्री मोटे यांच्या बरोबर अंशुमन विचारे, प्रिया गमरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोघे, पदम सिंग, स्वाती असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रदीप के. शर्मा व दीपक रुईया ह्यांनी मिळून केली आहे. चित्रपटांत एकूण चार गाणी आहेत. एवढचं काय तर मीरा जोशी वर धमाकेदार आयटम सौंग चित्रित केले आहे. चित्रपटांचे चित्रिकरण भोर व मुंबई मधील फिल्मसिटी येथे करण्यात आले आहे. चित्रपटांचे पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण होताच निर्मात्यांचा सिनेमा लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस आहे.