Amrish Puri’s grandson to make debut in Marathi Industry

Zindagi Vitrat article 03

 

बॉलिवूड मधील कलाकारांची मुले त्याच क्षेत्रात जाण्याचा व करियर करण्याचा प्रयत्न करतात . याचा उद्धरण म्हणजे आज अनेक स्टार पुत्र, स्टार कन्या आपल्याला या क्षेत्रात पाहायला मिळतात. सध्या बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेता पृथ्वीराज कपूर यांची चौथी पिढी बॉलिवूडवर आपले अधिराज्य करत आहे. अनेक कलाकारांच्या मुलानें आपले करियर करून विशेष स्थान निर्माण केले आहे.

 

Zindagi Vitrat article 01

 

असच एक दिग्गज अभिनेता म्हणजे अमरिश पुरी .अभिनेता अमरिश पुरी यांनी मिस्टर इंडिया, नागिन यांसारख्या चित्रपटात रंगवलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहे. मोगॅम्बो खुश हुआ…’ म्हणत अवघ्या सिनेजगतावर मोहिनी घातलेले व्हिलन अमरीश पुरी यांचा नातू चक्क मराठी सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. मात्र तो आजोबांप्रमाणे अभिनय करणार नाही तर सिनेमाची निर्मिती करत आहे. अंजनेय साठे असं त्याचं नाव आहे. अमरिश पुरी यांच्या नातवाने करियरसाठी बॉलिवूड नव्हे मराठी इंडस्ट्रीची निवड केली आहे हे विशेष.

 

अंजनेयची आई म्हणजे अमरीश पुरी यांची मुलगी. हा इतका अभिनयाचा वारसा सोडला तर अंजनेयच्या कुटुंबातले इतर सर्व डॉक्टर आहेत. अनेक म्युझिकल कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्यानंतर अंजनेय आता ‘जिंदगी विराट’ नावाचा चित्रपट करतोय. ‘सिनेमाची निर्मिती करत असताना एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे, ती म्हणजे सिनेमा हा संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघण्यासारखा हवा ‘ असे अंजनेय सांगतो.

 

Zindagi Vitrat article 02

 

‘वडील-मुलाच्या नात्यावर आधारित हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनपट आहे. किशोर कदम, भाऊ कदम, अतुल परचुरे, उषा नाईक या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत संघमित्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय तरकेले असून सुरज-धीरज यांनी संगीत दिलंय. सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी, जावेद अली या दिग्गज गायकांनी गाणी गायली आहेत. ‘जिंदगी विराट’ येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.