Amey Wagh and Sai Tamhankar will be seen together in this movie.

सोशल मीडिया वर सध्या अभिनेता अमेय वाघ यांची चर्चा सुरु आहे . आणि त्याचा कारण म्हणजे त्यांनी टाकलेल्या विविध पोस्ट , या पोस्ट मुळे त्याला आगामी चित्रपटात ‘गर्लफ्रेंड’ मिळणार की नाही? आसा प्रश्न सगळ्यांना पडला होता. इतकंच नाही तर आघाडीच्या अभिनेत्रींनी सोशल मीडियातून थेट अमेयला ‘गर्लफ्रेंड’ मिळाली का? असे प्रश्न देखील विचारले. ‘गर्लफ्रेंड’ या नावाचा त्याचा आगामी चित्रपट येत असून या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडिया वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टर मुळे या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून अखेर नचिकेत प्रधान म्हणजेच अमेयला त्याची अलिशा मिळाल्याचे दिसते आणि अलिशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर दिसणार असल्याचेही या पोस्टरमधून स्पष्ट झाले आहे.

 

Amey and Sai 01

 

या चित्रपटाच्या निमित्ताने अमेय आणि सई पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या मुळे ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या च्या टेक्नोसॅव्ही जगातील एका मुलीची कथा या चित्रपटात लेखक – दिग्दर्शक उपेंद्र सिधये यांनी मांडली आहे. नचिकेता या व्यक्तिरेखेसाठी अमेयने खास तयारी केली असून त्याने तब्बल ८ किलो वजन वाढवले आहे . विशेष म्हणेज त्याचा वेगळा लुक या चित्रपटामध्ये दिसणार आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर हिचाही हटके अंदाज आपल्याला या पोस्टर मध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा दृढनिश्चय केलेल्या नचिकेताला त्याची अलिशा कशी? कुठे? आणि कधी मिळाली? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Amey and Sai 02

 

अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाला हृषीकेश, सौरभ, जसराज यांचे संगीत लाभले असून क्षितीज पटवर्धन यांची गीते आहेत. अमेय आणि सई अशी हि वेगळी जोडी प्रेक्षकांसमोर आणणारा ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.