Amey Wagh & Mithila Palkar going on a movie date

Muramba movie date 03
आपल्या देशात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट प्रेमेंसाठी देव आहे. लवकरच या आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार आहे. सचिन चा हा चित्रपट पाहण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत. ‘मुरांबाचे’ आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर हे देखील हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या सोशल अकॉउंट वर त्यांनी ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोसोबत ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ असे हि लिहिले आहे. ‘मुरांबा’ २ जूनला येणार आहे कारण मेच्या २६ तारखेला ते सुद्धा ‘सचिन’ बघायला जाणार असल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत.

 

‘मुरांबा’ या चित्रपटाचा आई-बाबा फेसबुकवर लाइव्ह हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आपण पहिला. या व्हिडिओला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसतंय.
या विडिओ मध्ये मुलं फेसबुकवर लाइव्ह जातात म्हणजे काय करतात? या उत्सुक्ते मुले आई बाबा लाइव्ह जातात. आणि त्यांच्या मुलांनी लपवून ठेवलेलं सिक्रेट अचानकपणे फेसबुकवर घोषित करतात. त्यांच्या या लाइव्ह हा व्हिडिओ मध्ये ‘मार्क झकरबर्गला’ देखील सल्ला देतात. हा व्हिडिओ पहिला कि तुम्हाला नक्की वाटेल की हे आपल्याही घरात घडू शकतं.
‘मुरांबा’ या चित्रपटाच्या या टीझर मध्ये टेक्नोसॅव्ही बाबा म्हणजे सचिन खेडेकर आणि सोशल मीडियापासून चार हात लांब राहणारी आई म्हणजे चिन्मयी सुमित यांचा धम्माल विनोदी अभिनय तुमहाला नक्कीच आवडेल.मुरांबा’ या आगामी चित्रपटामधे अमेय वाघ, मिथिला पालकर, चिन्मयी सुमित आणि सचिन खेडेकर हे मुख्य भूमिका साकारणार आहेत.

 

‘मुरांबा’ २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Muramba movie date 01

Leave a Reply

Your email address will not be published.