‘Agnipankh’ movie team meets chief minister Devendra Fadnavis

Agnipankh meets devendra fadnavis 01

 

सध्या भारतात मोठ्या शहरांमध्ये उंच टॉवर्स बांधले जात आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाचं कार्यक्षेत्र रुंदावलंय व त्याचं महत्वही आपल्याला समजू लागलंय.निर्मात्या ऋतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड लवकरच घेऊन येत आहेत अग्निशमन दलावर आधारित चित्रपट ‘अग्निपंख’.

 

‘अग्निपंख’ या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय ॲक्शनपटाच्या टीमने मुहूर्तापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. निर्मात्या ऋतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड, अभिजीत गायकवाड, दिग्दर्शक गणेश कदम, पटकथा-संवाद लेखक सचिन दरेकर आणि जनसंपर्क अधिकारी मयूर आडकर या वेळी उपस्थित होते. ऋतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड यांनी ‘अग्निपंख’ च्या बहुचर्चित पहिल्या टीझर पोस्टरची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली.या चित्रपटाचे पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी केले असून या चित्रपटाचा घटनापट मुख्यमंत्र्यांसमोर उलगडला तसेच दिग्दर्शक गणेश कदम यांनी या चित्रपटाच्या भव्यतेविषयी तसेच चित्रीकरणातील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती दिली.

 

Agnipankh meets devendra fadnavis 02

 

आतापर्यंत आपण सैन्यदल तसेच पोलीस दलावर आधारित अनेक चित्रपट पहिले आहेत. पण अग्निशमनदलावर आधारित चित्रपट आपण पहिला नाही. ‘अग्निपंख’ या चित्रपटाच्या माध्यमाने कशाचिही पर्वा न करता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवाची बाजी लावून मोहिम फत्ते करणाऱ्या अग्निशमन दलाची शौर्यगाथा इतक्या भव्य प्रमाणात भारतात प्रथमच दाखवली जाणार आहे . हा चित्रपट मराठीत येत असल्याचे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अग्निपंख’ च्या टीमचे कौतुक केले व आपल्यालाही अभिमान वाटल्याचे सांगितले. या अभिमानास्पद चित्रपटाचा एकूण आवाका लक्षात घेता, आवश्यक असलेल्या बाबींसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.