‘Agnipankh’ the first Indian Action Movie on Fire Brigade

Agnipankh 01

‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम घेऊन येत आहेत त्यांचा नवीन चित्रपट ‘अग्निपंख’ या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल नेटवर्किंग साईटवरून लाँच करण्यात आले. या पोस्टरकाढे पाहता तुम्हाला हॉलीवूड चित्रपटाची आठवण होईल. फायर ब्रिगेडवर आधारीत या बिग बजेट चित्रपटावर सध्या काम सुरु आहे. तसेच आता हे अनोखे पोस्टर सगळीकडे चर्चेचा विषय बनत आहे.

 

पृथवर होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती तसेच महाकाय अग्नितांडवांपासून मनुष्य तसेच पशु पाक्षी यांचा बचावासाठी नेहमीच कार्यश्रम असतात अग्निशमन दलातील व्यक्ती. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नि आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा आपण दैनंदिन जीवनात पाहत असतो. या धाडसी व कर्तव्यनिष्ठ अग्निशमन दलाचा संघर्ष ‘अग्निपंख’ या रोमांचक चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अग्निशमन दलावर आधारित हा पहिला भारतीय चित्रपट असून भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञ या चित्रपटात सहभागी झाले आहेत. या चित्रपटातील दृश्यानुभव उच्च प्रतीचा असून अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

 

या चित्रपटाची निर्मिती रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड यांनी केली आहे. या चित्रपटातील कलाकारांविषयी माहिती सध्या गुप्ता ठेवण्यात आली आहे. ‘अग्निपंख’ या चित्रपटाची ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे.