Actress Smita Tambe becomes Film Producer with ‘Saavat’

 

मराठी चित्रपटातून साकारलेल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमूळे स्मिता तांबे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. आता त्या नवीन चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करीत आहेत. महिला सशक्तीकरणावर आधारित चित्रपटाची निर्मिती त्या करीत आहेत. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ ह्या सिनेमाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचे ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करते आहे.

 

सावट या चित्रपटात इन्स्पेक्टर आदिती देशमुखच्या हि भूमिकेत स्मिता तांबे साकारत आहेत .वैयक्तिक जीवनात त्या “उंबरठा आणि ‘जैत रे जैत’ च्या स्मिता पाटील ह्यांच्या भूमिका, ‘एक होता विदुषक’ सिनेमातली मधु कांबीकरांची भूमिका, स्मिता तळवलकरांची ‘चौकट राजा’मधली भूमिका, ‘उत्तरायण’मधली नीना कुलकर्णींची भूमिका ह्या आणि अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांनी त्या कायम त्यांच्या नजरेसमोर ठेवतात. आणि यामुळेच कदाचित त्यांना अभिनय क्षेत्रात नेहमीच सशक्त महिलांच्याच भूमिका आकर्षित करत राहिल्यात. सीबीआय ऑफिसर आदिती देशमुखची भूमिकाही अशीच सशक्त, हुशार पोलिस अधिकाऱ्याची आहे. आणि प्रेक्षकांना ती नक्की आवडेल.

 

‘सावट’ या चित्रपट अभिनया सोबतच निर्मिती करण्याविषयी अधिक माहिती देताना स्मिता तांबे म्हणाल्या , जेव्ही सौरभ हा चित्रपट घेऊन आले तेव्हा त्यांना चित्रपटाची कथा इतकी आवडली की, त्यांनी चित्रपटात काम करण्यासोबतच निर्मिती करायचे ठरवले.८ मार्चला जागतिक महिला दिन असतो. आणि त्याच महिन्यात स्मिता तांबे महिला सबलीकरणावरच्या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करीत आहेत.

 

Saavat Producer Actress Smita Tambe 02

 

‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहेत. ‘सावट’ हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.