Actor Directer Nishikant Kamat to be seen as a comedy villain in “Fugay”

निशिकांत कामत यांना आपण अनेक बॉलीवूड चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून पहिले आहे . यांचप्रमाणे त्यांनी बॉलीवूडसाठी दिग्दर्शन देखील केले आहे. लवकरच प्रसीद्ध होणाऱ्या फुगे’ या मराठी चित्रपटातून खलनायकचा भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहे. याआधी त्यांच्या ‘रॉकी हँण्डसम’ या हिंदी सिनेमामध्ये ‘खलनायक’च्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. निशिकांत कामत यांनी मराठीत ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. इरफान खान यांचा सुप्रसीध्द चित्रपट ‘मदारी’ निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता .

Nishikant
Nishikant

आगामी चित्रपट ‘फुगे’ यामध्ये निशिकांत कामत यांनी गोव्यातील एका गाव गुंड्याची भूमिका केली आहे .‘भैरप्पा’ असे या खलनायकाचे नाव आहे ,खलनायक म्हंटला तर तो वाईट, क्रूर असा असतो, मात्र या सिनेमातील निशिकांत यांनी साकारलेला खलनायक अगदी निराळा असून, तो प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा आहे. हा गुंड जितका रागीट आहे तितकाच प्रेमळ देखील आहे. ‘एकच फाईट आणि वातावरण टाईट…’

आसा निशिकांत यांचा संवाद प्रेक्षकांना वेड लावणार ठरणार आहे हे नक्की . निशिकांत कामतचे हे रागीट व प्रेमळ गुंडांचे विनोदी रूप प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

‘फुगे’ हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला असून इंदर ,राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती आहे . स्वप्नील जोशी व सुबोध भावे या जोडीबरोबरच या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, आनंद इंगळे, मोहन जोशी , सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘फुगे’ हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारी २०१७ ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.