नागराज मंजुळेंनी केला खुलासा ‘सैराट’ च्या हिंदी रिमेकबद्दल

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट ह्या चित्रपटाने २०१६ या वर्षात भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वांचं भारावून सोडले आहे . नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाने आणि त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. पण, याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकबद्दल मात्र नागराज मंजुळे संभ्रमातच दिसले. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकबद्दल विचारले असता ‘मला माहित नाही असे होणार आहे की नाही. ‘पता नही अभी तक कुछ’, असे नागराज मंजुळे म्हणाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नागराज मंजुळे यांनी स्वत:सुद्धा विविध भाषांमध्ये या चित्रपटाच्या रिमेकसाठी उत्सुकता दाखविली आहे. ‘हा चित्रपट विविध भाषांमध्ये आला तर ते मलाही आवडेल’, असे नागराज म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शित या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी करण जोहर पुढे सरसावल्याची चर्चा होत आहे. झी वाहिनीसोबत एकत्र येत या चित्रपटाद्वारे करण श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला चित्रपटसृष्टीमध्ये एक नवी ओळख देऊ शकतो असेही म्हटले जात होते. ‘सैराट’चे दिग्दर्शन करत मराठी चित्रपटांना एक नवी ओळख देणाऱ्या नागराज मंजुळे यांना हिंदी ‘सैराट’च्या रिमेकविषयी विचारले असता नकार देत ते म्हणाले की, ‘नाही. सैराट हा विषय माझ्यासाठी आता संपला आहे’

Leave a Reply

Your email address will not be published.