Tejshree Pradhan has a crush on Brett Lee…

Tajeshree P 01

अतिशय लाडिकपणे ‘काहीही हां श्री’ असं म्हणत टीव्ही प्रेक्षकांना वेड लावणारी आपली लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आपल्याला तन्वी च्या भुमिकेत पाहायला मिळाली .’ती सध्या काय करते’ या चित्रपटाने तीन दिवसांत साडेपाच कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून या चित्रपटात अंकुश आणि तेजश्री प्रधान अशी नवी फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्याप्रमाणे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि प्रसीद्ध गायिका आर्या आंबेकरचा यांचा हा पहिला चित्रपट होता.

तेजश्री प्रधान हिचा पहिलाचित्रपट ‘लक्ष्मी’ हा होता , पण काही कारणांमुळे त्याचं शूटिंग कधीच पूर्ण झालं नाही आणि तो प्रदर्शितही झाला नाही. या नांतर ती ‘या गोजिरवाण्या घरात’ ही मालिका करत होती .या मालकी नंतर ‘लेक लाडकी या घरची’ या मालिकेत तिला आपण प्रमुख भूमिकेत पहिले आणि त्यानंतर ‘होणार सून.’ या मालिकेने तिला महाराष्ट्र घरोघरात तिला जानव्ही म्हणून प्रसिध्दी मिळाली. प्रशांत दामले आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांच्या सोबत ‘कार्टी काळजात घुसली’ हे मराठी नाटक तिने केले . तसेच शर्मन जोशी यांच्यासोबत ‘मैं और तुम’ हे हिंदी नाटक ती करत आहे .
आपल्याला माहिती आहे कि मोठमोठे सेलिब्रिटीज सर्वसामान्यांचे क्रश असतात, पण या सेलिब्रिटीज चा स्वतःचा कोणावर क्रश असूशकेल हे नक्कीच . त्याचप्रमाणे मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानचे देखील एक क्रश आहे, तोच म्हणजे आॅस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली .नुकत्याच एका मुलाखतीत तेजश्री सांगितले कि ,आॅस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली हा माझं वन अ‍ॅण्ड ओन्ली क्रश आहे. तिला ब्रेट ली अगदी लहानपणापासून खूप आवडतो ,व तिच्या जवळच्या ससर्वांना हि गोष्ट माहिती आहे . शाळेत असताना भूगोलाच्या तासाला आॅस्ट्रेलिया या देशाचं नुसतं नाव जरी आलं तरीपण साधारण पूर्ण वर्ग तिच्याकडे कडे वळून बघायचा. तिच्या शाळेतले सगळेजण तिला वृत्तपत्रात आलेले ब्रेट लीचे फोटो आणून द्यायची.तिचा ब्रेट लीवर इतका क्रश होतं की ब्रेट लीचे छोटे-छोटे फोटो काढून एका वहित चिकटवून ती वही जपून ठेवली होती.
तिच्या आठवणींपैके एक किस्सा आसा होता कि , २०१३ साली भारत-आॅस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघामध्ये वर्ल्डकप झाला होता व त्यात आॅस्ट्रेलिया जिंकली होती.भारत हरल्यामुळे तिचे बाबा खूप निराश झाले होते पण तितक्यात तिच्या एका मित्राने अगदी उत्साहात घरी फोन केला व तेजश्री ला आवडणारा ब्रेट ली जिंकला म्हणून फोन केला असेही सांगितले. यावर तिचे बाबा त्याला आणि तिला खूप ओरडले आणि आपला देश हरला याच काहीचं वाटतं नाही का? असे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.