SRK and Anushka Sharma on sets of Chala Hawa Yeu Dya

  SRK and Anuskha on Chala Hawa Yeu Dya 03

 

सध्या जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे.बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आणि बॉलीवूडची क्युट अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच झी मराठीवरील धम्माल विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाला भेट दिली.‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघे मराठा मोळ्या अंदाजात उपस्थित होते. मी मराठी शिकत आहे असे या वेळी अनुष्का शर्माने सांगितले. या वेळी शाहरुख खान यांच्या प्रसिद्ध चित्रपट बाजीगर यावर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आले. तसेच एक विशेष शाळा देखील भरवण्यात आली या शाळेमध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनी मराठी कलाकारणच्या जोड्या ओळकण्याचा खेळ खेळाला.

 

SRK and Anuskha on Chala Hawa Yeu Dya 02

 

शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनी या कार्यक्रमात खूप धम्माल केली व ‘चला हवा येऊ द्या’ च्या संपूर्ण टीम ने केलेल्या मनोरंजनाचा मनसोक्त आनंद लुटला. या कार्यक्रमातील विशेष गोष्ट म्हणजे अनुष्का आणि शाहरुख यांनी चक्क मराठीतील सौवाद सादर केले व प्रेक्षकांची मनें जिंकली. अनुष्का आणि शाहरुख यांचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ च्या प्रमोशनसाठी हे दोघेही ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर आले असतांना त्यांना मराठीतून काही वाक्य बोलण्यास लावले

 

त्यांनी बोलल्या संवादात अनुष्काने काही सलग मराठी संवाद सादर केला आहे. तर शाहरुख याने ‘नटसम्राट’ चित्रपटातील अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलेला संवाद सादर केला. तसेच या वेळी शाहरुख खान यांच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास पात्र स्वरूपात सादर करण्यात आला.