Special show of ‘Zhala Bobhata’ for Mumbai dabevale…

Mumbai dabbewale 01

नुकताच प्रदर्शित झालेला , झाला बोभाटाचा या चित्रपटाचा खास शो मुंबईतील डबेवाल्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. मुंबईत जवळपास पाच हजार डबेवाले असून, ते सुमारे दोन लाख ग्राहकांना आठवड्यातील सहा दिवस जेवणाचे डबे पोचवतात.मुंबईतील प्रसिद्ध डबेवाले यांनी जवळपास दीडशे वर्षे ऊन, पाऊस, पूर आणि अगदी दंगलीच्या दिवसांतही मुंबईतील लाखो नोकरदारांना घरचे जेवण पुरवणारे डबेवाले आता वेबसाइटद्वारे आपले कार्य करणार आहेत.
झाला बोभाटा हा चित्रपट अनुप जगदाळे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास करोडोंची कमाई केली आहे . संपूर्ण जगात मुंबईतील डबेवाले हा कुतूहलाचा विषय आहे, डबेवाल्यांची प्रसद्धि इतकी आहे की त्यांना भेटण्यासाठी जगभरातुन मोठमोठी माणसं येतात. त्यांच्याविषयी व त्यांच्याकामाविषय माहिती जाणुन घेण्यासाठी उत्सुक असतात. अनेक बॉलिवुड आणि मराठी चित्रपटातदेखील या कष्टकरी डबेवाल्यांची माहिती दाखवली आहे.

झाला बोभाटा या चित्रपटाचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष यांनी झाला बोभाटा या चित्रपटाचा खास शो मुंबईतील डबेवाल्यांसाठी दाखवण्याचा खास शो आयोजित केला. या चित्रपटाचा विषय एका गावावर आधारित आहे .मोनालिसा बागल आणि मयूरेश पेम हया कलाकारांनी मुख्य भुमिका साकारली असून हे दोनी नवोदित कलाकारा या चित्रपटातील अभिनयने प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे. तसेच चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम हे कलाकार आहेत. या चित्रपटातील पैंजण या गाण्याने सोशलमीडियावर धुमाकूळ घातला आहे. जेष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी एक अगदी वेगळीच भुमिका साकारली आहे .

एका गावावर आधारित या चित्रपटामध्य गावात असलेल्या बारा भानगडी दाखवल्या आहेत. चित्रपटात मान्याची वाडी दाखवण्यात आली आहे , ही मान्याची वाडी फक्त आदर्श गाव पुरस्कार असला की नटते-सजते, सोहळा संपला की मात्र जैसे थे. भ्रष्टाचार, स्वच्छता, पाणीटंचाई, दारूबंदी अशा अनेक प्रश्नांना कंटाळून गेलेले आहे. आशय उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी या गावातील गावकरी एकत्र येतात आसा काहीसा या चित्रपटाचं कथानक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.