Mahalakshmi Iyer will sing for a Marathi movie again

Mahalakshmi Iyer 01

 

महालक्ष्मी अय्यर हि एक उत्तम गाइका असून तिने अनेक अप्रतिम गाणी गायली आहेत. बऱ्याच गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये तिने गायलेली गाणी सुपर हिट झाली होती. दस, दिल से, झंकार बीट्स या हिंदी चित्रपटांमधून तिने गायलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. इतकाच नाही तर तिने कमस, कहता है दिल, अस्तित्व एक प्रेम कहाणी, थोडी खुशी थोडी गम यांसारख्या मालिकांसाठी तिने शीर्षकगीते गायली आहेत. तिचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे म्हणजे तिने तामिळ, तेलगू, बंगाली, आसामी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. तिने गायलेल्या या गाण्यांना प्रेक्षकांची भरपूर पसंती देखील मिळाली.

 

शर्यत, टाईमपास, टाईमपास 2, काय राव तुम्ही यांसारख्या चित्रपटातून महालक्ष्मी ने गायलेली गाणी मराठी प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करीत आहेत. लवकरच ती एका मराठी चित्रपटासाठी गाणार असून या गाण्यासाठी तिने नुकतेच रेकॉर्डइंग केले आहे. या आगामी गाण्याविषयी तिला खूप उत्सुक आहे.तसेच या गाण्याविषयी माहिती तिने तिच्या फॅन्सला तिच्या सोशल नेटवर्किंग साईट च्या माध्यमातून कळवली. तिने तिच्या अकॉउंटवर एक फोटो शेर केला असून त्यासोबत नवीन गाण्याचे रेकॉर्डिंग असे लिहिले आहे.

 

तिच्या सोबत आपल्याला या फोटोमध्ये संगीतकार चिनार-महेश, गीतकार मंगेश कांगणे हे सुद्धा दिसत आहेत. हे गाणे रेट्रो स्टाइलचे असल्याचे तिने सांगितले आहे. मंगेश कांगणेने यांनी हे गाणे लिहिले असून चिनार-महेश या जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. टाइमपास आणि टाइमपास 2 या चित्रपटात महालक्ष्मीने चिनार-महेशसोबत एकत्र काम केले होते. मात्र हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे या विषयी माहिती सध्या गुप्ता ठेवण्यात आली आहे. तिचे हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.