Kumar Sanu will sing for upcoming movie ‘Hostel Days’

Kumar Sanu for Hostel days 01

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मते सध्या प्रादेशिक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी बनवली जात आहेत. प्रादेशिक गाण्यांचे बोल त्यांना आवडतात. त्याचप्रमाणे गाण्याच्या संगीताला त्या प्रादेशिक भाषेची छटा असते त्यामुळे हि गाणी प्रेक्षकांना उत्तम वाटतात. या सर्व कारणानं मुळे त्यांना प्रादेशिक भाषेत गाणे जास्त आवडते.

आजपर्यंत कुमार सानू यांनी अनेक मराठी गाणी गायली आहेत. नुकताच त्यांनी हलके हलके या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हॉस्टेल डेज या आगामी मराठी चित्रपटासाठी ते गाणार आहेत. हॉस्टेल डेज या चित्रपटातील एका रोमँटिक गाण्याला त्यांचा आवाज लाभणार आहे. हे मंदार चोळकरने यांनी लिहिले असून मंदारने हे माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी हॉस्टेल डेज या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक आहेत व त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे पोस्टर पोस्ट केले होते. या पोस्टर कडे पाहता अतिशय आनंदात असणारी मुले-मुली आपल्याला दिसतील. त्याचप्रमाणे आयुष्यातले सगळ्यात मस्त क्षण अशी या चित्रपटाची टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे.

हॉस्टेल डेज हा चित्रपट पाहताना ९०च्या दशकातला काळ तुम्हाला नक्की आठवेल. त्याच प्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला काळ या चित्रपटामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. प्रार्थना बेहरे यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे.

Kumar Sanu for Hostel days 02

Leave a Reply

Your email address will not be published.