Do you know what is Ashok Saraf’s son Aniket’s profession

Aniket Saraf

 

बहुतेकवेळी आई वडील ज्या क्षेत्रात असतात त्याच क्षेत्राची निवड त्यांची मुले देखील करतात. त्यामुळे डॉक्टर, वकील यांची मुले देखील अनेकवेळा डॉक्टर, वकीलच बनतात. अभिनय क्षेत्रा बाबत तर आपल्याला ही गोष्ट हमखास पाहायला मिळते. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक जण अभिनय क्षेत्रातच करियर करायचा प्रयत्न करतात.

 

यापैकी काही उत्तम उद्धरण म्हणजे अमिताभ बच्चन, राकेश रोशन, जितेंद्र अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची पुढची पिढी देखील सध्या आपल्याला बॉलिवूडमध्येच आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. या शिवाय मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्याला हाच ट्रेंड पाहायला मिळतो. सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया, महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ, विजय चव्हाण यांचा मुलगा वरद, निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय या सर्वानी आपल्याला आपल्या आई वडिलांप्रमाणेच याच क्षेत्रात करियर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आणि यातील अनेकांना या क्षेत्रात चांगले यश देखील मिळाले आहे.

 

Aniket Saraf 01

असाच एक दिग्गज अभिनेता म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांनी त्याच्या सकस अभिनयाने एक काळ गाजवला आहे. त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हम पाच हि त्यांची मालिका खूप गाजली होती. तसेच त्यांची पत्नी निवेदिता सराफ हि सुद्धा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजदेखील अशोक सराफ यांच्या अभिनयाचे, कॉमिक टायमिंगचे सगळेच कौतुक करतात. तसेच निवेदिता देखील अनेक मालिकांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दोघांचा मुलगा म्हणजे अनिकेत सराफ याला अभिनयात अजिबातच रस नाहीये. त्याला अभिनय क्षेत्राविषयी अजिबात प्रेम नाही. तोच काही वेळा त्याच्या आई वडिलांसोबत काही कार्यक्रमांना हजेरी नक्कीच लावतो. पण त्याला आपण अभिनय करावा असे अजिबात वाटत नाही. त्याला आवड आहे कूकिंची . हाय अभिनेता अशोक सराफ यांचा मुलगा खूप चांगला शेफ असून तो पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. त्याचे युट्युबला निक सराफ या नावाने अनेक व्हिडिओ देखील आहेत. त्याच्या या जेवण बनवताना दाखवलेल्या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओंना खूप चांगले व्ह्यूज आहेत.