Kedar Shinde’s upcoming movie ‘Raibacha Dhadaka’

Kedar Shinde new movie Rayabacha Dhadaka

लवकरच ​केदार शिंदे यांनी दिग्दर्शत केलेला ‘रायबाचा धडाका’ या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. ‘रायबाचा धडाका’ या चित्रपटातून आल्हाद अंडोरे आणि राधिका या दोन नव्या कलाकारांचे पदार्पण होणार आहे. मराठी चित्रपटांची चालती पाहता सर्व क्षेत्रातील निर्माते दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीकडे आकर्षति होत आहेत. तेलंगणातील हैद्राबादस्थित तेलगू चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या श्री विजयासाई प्रॉडक्शन लवकरच एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण ‘लवासा’, ‘आळंदी’, ‘मुंबई’, ‘ठाणे’, ‘पुणे’ या ठिकाणी करण्यात आले आहे.

‘रायबाचा धडाका’ या चित्रपटातील आल्हाद अंडोरे आणि राधिका या कलाकारांच्या लुक बाबत माहिती गुप्ता ठेवण्यात आली आहे. तसेच चित्रपटाचा विषय आणि इतर कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रॉडक्शन हाऊलतर्फे लवकरच या बाबत खुलासा केला जाईल.

तेलगू सिनेमाच्या भव्य यशाचा नवा फॉर्मुला मराठी चित्रपटत वापरताना मराठी बाणा तसेच राहावा असा या संपूर्ण टीम चा प्रयत्न आहे. हा चित्रपट बनवताना मराठी चित्रपटांचा इतिहास, प्रेक्षकांची आवड आणि स्पर्धा या सगळ्या गोष्टींचं बारकाईने विचार केला जाणार आहे. रायबा आणि शुभ्रा यांच्या प्रेमाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. रायबा आणि शुभ्रा ही नवी जोडी या चित्रपटामुळे प्रेक्षकांना सामोरे येणार आहे. हा चित्रपट अत्यंत हलकाफुलका कुटुंब प्रधान मनोरंजक चित्रपट आहे. प्रसिद्ध डीओपी सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी आणि पंकज पडघम यांचे श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.