Get ready to dance with Comedy King Johnny Lever & Dance Queen Manasi Naik..

मराठीतील डान्स Queen मानसी नाईक लवकरच एका आगामी अल्बममध्ये पाहायला मिळणार आहे. या आगामी अल्बमची विशेष गोष्ट म्हणजे या अल्बममध्ये तिच्यासोबत  किंग ऑफ कॉमेडी जॉनी लिव्हर हि असणार आहे.

प्रथमच जॉनी लिव्हर आणि मानसी नाईक ‘मला लगीन करायचंय’ या गाण्याच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. ‘मला लगीन करायचंय’ हे गाणं आपल्या सर्वांचे लाडके आदर्श शिंदे यांनी गायले आहे . या गाण्याचे संगीत दिग्दर्शन स्वरुप भलवनकर यांनी केले आहे. विशेष म्हणजे या गाण्याची कोरिओग्राफी आणि निर्मिती DID फेम सिध्दाशे पै याने केली आहे.

Mansi naik Jonny Lever 01
Mansi naik Jonny Lever

प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता जॉनी लिव्हर व आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मानसी नाईक यांना एकत्र पाहताना नक्कीच धम्माल येणार आहे.

नुकताच मानसीचे, बाई वाडयावर या… गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते .लग्न असो या पार्टी सर्व ठिकाणी हेच गाणे वाजताना दिसत असल्याचे पाहायला मिळत होते.  आता या गाण्यानंतर तिला ‘मला लगीन कराचयं आहे’ या गाण्यावर प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ‘मला लगीन करायचंय’  हे गाणे खूपच दमदार  होणार असुन , प्रेक्षकांना आपल्या तालावर थिरकवणार आहे असे मानसीला वाटते.  या  गाण्यामध्य बॉलिवुडचे या कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्या सोबत नृत्य करण्यास मिळणार असल्याने  मानसी  खूपच आनंदित झाले आहे. या गाण्यामध्ये आपल्या या लाडक्या दोन कलाकारनसोबत  नृत्याचा  बादशाह DID फेम सिध्दाशे पै प्रेक्षकांना पाहिला मिळणार आहे.

नुकताच या गाण्याचे चित्रिकरण सुरू झाले आहे.सिध्देश पै.  या कलाकाराने डान्स इंडिया डान्स या रिऍलिटी शो मधुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सिध्देशची आसा अल्बम तयार करण्याची ही आयडिया असून त्यानेच हे गाणे दिग्दर्शन आणि कोरिओग्राफही केले आहे.या गाण्याला संगीत स्वरूप भालवणकर यांनी दिले आहेत.बाई वाडयावर या गाण्यानंतर मानसी नाईक ही मला लगीन कराचयं या गाण्यावर आपली कमल दाखवेल हे नक्की .

Leave a Reply

Your email address will not be published.