Bhau Kadam starts strugglers canteen find out why ?

JVA 03

 

माणसाला कोणती ही गोष्ट मिळवायची असेल तर त्याला कष्ट करावेच लागतात. कितीही शिक्षण घेतलं तरी नोकरी किंवा व्यवसाय या करीता करावा लागणार स्ट्रगल कुणाला चुकला नाही.कोणतेही काम मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. स्टगलर्स कँटिन हे अशाच काही स्ट्रगलर्ससाठी भाऊ कदम यांनी सुरू केलं आहे. आता हे कँटिन खरंखुरं नसून आगामी चित्रपट “जगा वेगळी अंतयात्रा” यामध्ये दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भाऊ कदम या कँटिनमध्ये स्टगलर्सना मार्गदर्शन करतात.

 

JVA 02

 

आतापर्यंत भाऊ कदम यांनी अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत. आगामी चित्रपट “जगा वेगळी अंतयात्रा” मधे त्यांची अतिशय धमाल भूमिका आहे. चित्रपटाची कथा चार सुशिक्षित बेकार तरुणांवर आधारित आहे. भाऊ कदम त्यांच्याकडे आलेल्या चार सुशिक्षित बेकार तरूणांना अंतयात्रा काढण्याचा सल्ला देतात. ते तरूण काम मिळवण्यासाठी तो सल्ला मानून अंतयात्रा काढतात आणि काय मजा होते ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अमोल लहांडे यांनी केलं आहे. भाऊ कदम यांच्यासह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे या नव्या दमाचे अभिनेते या चित्रपटात दिसणार आहेत. “जगा वेगळी अंतयात्रा” हा चित्रपट २३ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.