Amruta and Viabhav may be seen together in Sanjay Jadhav’s upcoming movie…

संजय जाधव त्यांच्या दिग्दर्शनाखाली लवकरचं एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटात एक फ्रेश जोडी दिसणार आहे.संजय जाधव यांच्या या आगामी चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगणा अमृता खानविलकर आणि मराठीसह बॉलिवूडमध्ये पण आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनता वैभव तत्त्ववादी यांची जोडी पाह्यला मिळणार आहे. या चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती लावरच दिग्दर्शक संजय जाधव जाहीर करणार आहेत.

Sanjay Jadhav new movie 01

संजय जाधव हे मराठीतल्या होतकरू दिग्दर्शक असून यांनी ‘चेकमेट’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’, ‘तू हि रे’ आणि ‘गुरू’ यांसारखे अनेक उत्कृष्ट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले. दुनियादारी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारली. या सिनेमामुळे संजय जाधव हे नाव घराघरांत जाऊन पोहोचले.

मराठी सिनेसृष्टीने केलेल्या नवनवीन प्रयोंगांमुळे आज हिंदी चित्रपटाना टक्कर दिली आहे. बॉलीवूड मधील मोठमोठ्या कलाकारांनी मराठी सिनेमाना भरभरून दाद दिली आहे. चित्रपट असो किंवा मालिका मराठी सिनेसृष्टी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहते.मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नेहमीचं प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आतोनात मेहनत घेत असतात. याशिवाय नवनवीन आशय, नवीन कलाकार किंवा नवीन जोड्या यासारख्या नवीन प्रयोगांवर जास्त लक्ष केंद्रित करत असतात.

संजय जाधव यांच्या या आगामी चित्रपटात अमृता-वैभवची या फ्रेश जोडीची केमिस्ट्री आपल्याला पाहायला पाहायला मिळेल असे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.