Amitabh Bachchan to work with Nagraj Manjule..

Amitabh and Nagraj 01

सैराट या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नागराज मंजुळे हे नाव महाराट्रातचं नव्हे तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध झाले आहे. सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले.रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकली . सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या नागराजच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.सैराट चित्रपटातील झिंगाटवर मराठीच काय पण संपूर्ण बॉलिवूड देखील नाचले आहे . इतकंच नाही तर या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील यश मिळविले. या चित्रपटातील गाणे आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत.
एक उत्कृष्ठ दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील नागराज मंजुळे याना मिळाला . सैराट या चित्रपटाच्या रिमेक चित्रपट विविध भाषांमध्ये लवकरचं प्रेक्षकांसमोर येणार आहे.
नुकताच बॉलिवूड मधील मिस्टर परफेक्शनीस्ट आमीरच्या पाणी फाऊंडेशसाठी एका व्हीडीओचे दिग्दर्शन नागराज यांनी केले होते. या व्हीडीओचे संगीत अजय-अतुल यांनी केले होते व अजयचा आवाज या गाण्याला लाभला होता.
अमिताभ यांनी सैराट या या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाला मिळालेली प्रसद्धि पाहून बॉलिवुडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यानाही या चित्रपटाचा मोह आवरला नाही, व त्यांनी सोशलमीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले. त्यांच्या या कौतुका मुळे पुन्हा एकदा सैराट या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.नागराज सध्या एका हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये व्यग्र असून हा हिंदी चित्रपट सैराटचा रिमेकच असणार आहे. करण जोहरची हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सैराटच्या या रिमेक मध्ये नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन पहिल्यादांच एकत्र काम करणार आहेत.
करण जोहर निर्मित बॉलिवुडच्या या रिमेकमध्ये श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर आर्चीची भूमिका साकारणार आहे. अमिताभ बच्चन जरी या चित्रपटामध्ये आहेत तरी त्यांची या चित्रपटातील भूमिका कोणती असणार हे अध्यापही एक गुपितच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.