Abinay talks about his father, Late Laxmikant Berde..

अफलातून अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा मुलगा अभिनय बेर्डे अभिनयक्षेत्रात उतरला. नुकताच प्रदर्शित झालेल्या ती सध्या काय करते या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारताना दिसला. हा चित्रपट राजश्री प्रोडक्शन होऊस यांचा असून लक्ष्मीकांत बेर्डे आणि राजश्री प्रोडक्शन यांचे खूप जवळचे नाते होते.राजश्री प्रोडक्शनच्या मैंने प्यार किया या सुप्रसिद्ध चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेने महत्त्वाच्या भूमिका साकारली होती. आज लक्ष्मीकांत नास्तानाही त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी राजश्री प्रोडक्शनच्या लोकांमध्ये ताज्या आहेत.

Abinay Laxmikant 01
Abinay and Laxmikant Berde

लक्ष्मीकांत व राजश्री प्रोडक्शन यांच्यामदे एक विशेष नाते होते . ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपताच्या स्वरूपात राजश्री प्रोडक्शनने अभिनयला एक विशेष गिफ्ट दिले आहे. लक्ष्मीकांतचा मुलगा अभिनय या चित्रपटात प्रमुख भूमिका करत असल्यामुळे मैंने प्यार किया या चित्रपटात एक दृश्य वापरायची परवानगी राजश्रीच्या मंडळीने एका क्षणात दिली . अश्याप्रकारे जर कोणत्याही चित्रपपाटील दृश्य वापरण्यात आले तर प्रोडक्शन हाऊस चांगलेच पैसे द्यावे लागतात.पण लक्ष्मीकांतमुळे राजश्रीने ती सध्या काय करतेच्या निर्मात्यांकडून एक रुपयादेखील घेतला नाही.
सतीश राजवाडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनय सोबत तेजश्री प्रधान व आर्य आंबेकर याना आपण प्रथमच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अंकुश चौधरी यांनी नेहमी प्रमाणे आपल्या अभिनयाची विशेष छाप सोडली.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे ‘ती सध्या काय करते’ चित्रपटाच्या प्रसिद्धी पूर्वी बोलताना असे म्हणाला की , जसा परीक्षेच्यावेळी लोकांच्या पोटात गोळा येतो, त्याप्रमाणे त्याच्या पोटात ग्लेशियर आला होता. त्याला खूप भीती व चिंता वाटत होती. त्याचबरोबर आपला पहिला चित्रपट असल्याचा तितकाच उत्साही देखील होता. या चित्रपटाची निर्मिती होताना त्याने खूप धमाल मजा केली.
त्याच्या खाजगी आयुष्यात ती कोण आहे असे विचारले असताना ,त्याला अनेकदा पहिल्या नजरेत प्रेम झालंय असेही त्याने सांगितले.

त्याला स्वत:ची एक वेगळी ओळख बनवायची आहे असे हि तो म्हणतो. त्याचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे एक धमाल कॉमेडीयन होते , पण त्यांच्याप्रमाणे अभिनयही कॉमेडी करणार आसा पूर्वग्रह प्रेक्षकांनी ठेऊ नये असेही त्याने सांगतले.

आज लक्ष्मीकांत बेर्डे असते तर तो जास्त घाबरलो असता असेही त्याला वाटते. त्याच्या बाबांचा स्वभाव कसा होता ते त्याला त्यांच्या मित्रांकडून समजले , प्रत्येकाला ते कामाच्या बाबतीत सल्ला द्यायचे. आज जर अभिनयाला त्यांच्या सल्ला मिळाला असता तर त्याला खूप बरं वाटलं असते. अभिनयने हा चित्रपट सर्व प्रथम त्याच्या बाबाना त्यांना दाखवला असता व तो कुठे चुकला हे जर त्यांच्याकडून त्याला कळालं असतं , तर त्याच्या मौल्यवान सल्ला प्रमाणे त्याने त्याच्या कामात सुधारणा केली असत्या.

अभिनयप्रमाणे सर्व प्रेक्षकांच्या मनात लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव कायम राज्य करणार हे नक्कीच..

One thought on “Abinay talks about his father, Late Laxmikant Berde..

  • May 9, 2018 at 8:13 am
    Permalink

    udyacha super star ahhe Abhinay Berde.
    Ek cinema release zhala ahhech ata dusra cinema pan release honar lavkarch.
    Hubehoob Laxmikant Berde ahhe Abhinay..

Leave a Reply

Your email address will not be published.