World Health Day Special :See what Mayrui Wagh does to be fit

Mayuri Wagh article 01
‘अस्मिता’ या मालिकेतील अभिनेत्री अस्मिता म्हणजेच मयुरी वाघ हि आपल्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय झाली आहे . मयुरी वाघ हिच्या मते फिटनेस आपल्या आयुष्यात फार महत्वाचा आहे व प्रत्येकाने स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिच्या खाजगी आयुष्यात फिट राहण्याकरिता तिने तिने एक वेगळंच वर्कआऊट प्लॅन केले आहे. ‘शोधलं की सापडतं’ अशा मताची असणारी अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा फंडा शोधून काढला आहे.

मयुरीला डान्स करणे खूप आवडतं त्यामुळे ‘झुंबा’ हा अनोखी रिदमीक वर्कआऊट तिने तिच्या फिटनेस साठी निवडला आहे. यावर्षी मयुरीने एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला आहे. नॉर्मल जिम मधील वर्कआऊट पेक्षा तिला झुंबा करणे खूप जास्त आवडते . रोज झुंबा क्लास ला जाण्याची ती आतुरतेने वाट पाहात असते.

मयुरीला हि वर्कआऊट ची पद्धत फार आवडली असून ती खूप एन्जॉय करतेय. या फिटनेस थेरपीची माहिती सगळ्यांना मिळावी यासाठी तिने तिच्या झुंबा डान्स मूव्हजचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या या विडिओ मुळे सगळ्यांनी फिटनेसविषयी जागृत व्हावे असे हि तिला वाटते. यासाठी झुंबा डान्स थेरपी फार महत्वाची आहे हे ती आपल्या या विडिओ मधून पटवून देत आहे.

झुंबामुळे तिला फिट आणि अॅक्टीव्ह राहायला मदत होते असे हि ती सांगते. झुंबामध्ये डान्सचा समावेश असल्यामुळे कॅलरीज बर्न होतात व झुंबा करताना एक वेगळा आनंद मिळतो . ‘झुंबा’ या होण्यासाठी ‘झुंबा’ फन वर्कआऊट मधून देखील आपण फिट आणि हेल्थी राहु शकतो हे या व्हिडीओतून मयुरीने दाखवून दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.