Ulka Gupta soon to be seen in this Marathi movie

‘झांसी की रानी’ या मालिकेतील मनु आठवते का तुम्हाला ? हो बरोबर बालवयातील राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री उल्का गुप्ता हि लवकरच मराठी चित्रपट झळकणार आहे. ‘ओढ’ असे या चित्रपटाचे नाव असून ती या चित्रपट प्रमुक भूमिका साकारणार आहे. पहिल्याच मराठी चित्रपटात तिची जोडी गणेश तोवर या नवोदित अभिनेत्यासोबत जमली आहे. या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पाहायला मिळणार आहे.

 

Odh 02

 

‘ओढ’ हा चित्रपट एस. आर. तोवर यांची निर्मिती आणि सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊस यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केलं आहे. कथानकाला अनुसरून उल्का आणि गणेश यांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. पहिला चित्रपट असूनसुद्धा उल्का तसेच गणेशने प्रचंड आत्मविश्वासाने काम केलं आहे. या चित्रपटात मैत्रीची गोष्ट पाहायला मिळणार असल्याचे सांगत उल्का म्हणाली की, ‘ओढ’ चं कथानक खूपच वेगळं आहे. ही प्रेम कथा नसून मैत्रीवर आधारित गोष्ट आहे. या चित्रपटात तिच्या सहकलाकाराविषयी सांगते कि,” गणेशचा जरी हा पहिलाच सिनेमा असला, तरी त्याच्या वागण्या-बोलण्यात तसंच अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नव्हता. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना कुठेही अडथळा आला नाही “.

अभिनेता गणेश सांगतो कि उल्का हि प्रसिद्ध अभिनेत्री असूनसुद्धा उल्काने कधीच बॉसगिरी करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने एका मित्राप्रमाणे गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ओढ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात मोहन जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. दिनेशसिंग ठाकूर यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केलं आहे. १९ जानेवारीला ‘ओढ’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.