Tejaswini Pandit continues her shooting even after high fever

Tejaswini shooting inspite of high fever 01 Tejaswini shooting inspite of high fever 02

 

सध्या ये रे ये रे पैसा या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे व या चित्रपटाच्या सेटवर तेजस्विनीची खास काळजी घेतली जातेय. याचा कारण असं कि अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची तब्येत तशी फारशी ठीक नाहीये. पण या अवस्थेत देखील तेजस्विनीने शूटिंग सुरु ठेवली आहे. तेजस्विनी पंडितने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम वर काही नवरात्री स्पेशल फोटो शेर केले आहे.

 

या फोटो पैकी एका फोटो मध्ये तिच्या हाताला सलाईनची सुई सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. काही लोकांना तर असे वाटले कि हा केवळ शूटिंग चा भाग आहे. परंतु तेजस्विनीची तब्बेत गंभीर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार तीला १०४ डिग्री ताप होता व तिला तात्काळ दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होतं.या नंतर केवळ दोन दिवस आराम करून तिने पुन्हा शूटिंग ला सुरवात केली. संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचे बऱ्यापैकी झाले असून सध्या तेजस्विनीचं चित्रीकरण सुरु आहे. शूटिंगच्या ठिकाणी मध्ये मध्ये ब्रेक घेऊन, औषधे घेणे, सलाइन लावणे असे उपचार करून ती तब्येत जपायचा प्रयत्न करीत आहे. पण तिचा कामातील उत्साह मात्र तसेच टिकून आहे. तिच्या सेटवरील एका फोटो ज्यात तेजस्विनी अगदी चादर लपेटून बसलीये.

Tejaswini shooting inspite of high fever 03

 

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमातील भूमिका असो किंवा मग ‘100 डेज’ मालिकेतील ग्लॅमरस भूमिका असो प्रत्येक भूमिकेला तेजस्विनीनं न्याय दिला. संवेदनशील अभिनय, ग्लॅमरस अदा आणि सौंदर्य यामुळे तेजस्विनी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री असलेल्या तेजस्विनीने स्वतःचा फॅशन ब्रँडही लॉन्च केला. त्यामुळे अभिनेत्री ते उद्योजिका असा प्रवास तिने यशस्वीरित्या पार केला आहे. ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार निर्मित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होणार आहे.