Superstar Swapnil Joshi becomes father again

Swapnil joshi becomes father 02

 

मराठी मनोरंजनसृष्टीचा चॉकलेट हिरो अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गोड बातमी आहे. स्वप्नील पुन्हा एकदा बाबा झाला आहे. स्वप्नील जोशीला पुत्ररत्न प्राप्त झालं. गुरुवारी स्वप्निलची पत्नी लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.स्वप्नील आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. गेल्याच वर्षी मे 2016 मध्ये  स्वप्निल-लीना यांच्या आयुष्यात छोट्या परी मायरा हिचे आगमन झालं होतं. आता ती आता दीड वर्षाची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब तसेच स्वप्नील जोशी यांचे मित्रमंडळ आनंदी झाले आहे.

 

Swapnil joshi becomes father 01

 

‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या स्वप्नील जोशीच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग नुकतंच सुरु झालं आहे. स्वप्नीलने आपल्या उत्तम अभिनयने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे तो महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणूनओळखला जातो. लिना जोशी ही मूळची औरंगाबाद येथील असून ती व्यवसायाने डेन्टिस्ट आहे.वयाच्या नवव्या वर्षी स्वप्नीलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून अभिनय करत प्रेक्षकांची माने जिंकली. यानंतर ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून त्याने त्याचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये आपण त्याला पाहत आलो. तसेच ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे सगळीकडे विशेष कौतुक करण्यात आले. ‘कॉमेडी सर्कस’ या विनोदी मालिकेतून त्याने कॉमेडी चे उत्तम टाईमिंग साधून प्रेक्षकांना खळखळून हसवले.

 

छोट्या तसेच मोठ्या पाड्यावर वेळोवेळी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या  स्वप्नीलला आज मराठीतील सुपरस्टार म्हणून संबोधले जाते. मराठी चित्रपटसृष्टीला ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत.