Sunny Leone soon to be seen in Marathi item song

Sunny Leone in Marathi 02
‘लैला मैं लैला’ या शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातील आयटम सॉँगवर नृत्य करणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच मराठी चित्रपटात आयटम सॉँग करण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सनी लिओनी मराठीतील एका बिग बजेट चित्रपटात आयटम सॉँग करणार आहे.

 

Sunny Leone in Marathi 01

अवधूत गुप्ते यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हि बातमी सांगितली. त्याचसोबत त्यांनी हे ही सांगितले कि ते एका मोठ्या प्रोजेक्टवर सध्या काम करत असून त्याच संदर्भात एका आयटम सॉँगसाठी त्यांनी सनी लिओनीला विचारले आहे. सनी लिओनीचा फॅन फोल्लोविंग खूप मोठा असल्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशन मधे फायदा होईल या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. बालीवूड मधील सुप्रसिद्ध कॉरिओग्राफ गणेश आचार्य हे या आयटम सॉँगसाठी कॉरिओग्राफी करणार आहेत.
विशाल देवरूखकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत . ‘लैला मैं लैला’ या गाण्यामधील सनीच्या नृत्याने सगळेच घायाळ झाले होते त्याच प्रमाणे तिचे मराठीतील हे आयटम सॉँग प्रचंड लोकप्रिय ठरणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

Sunny Leone in Marathi 03

सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी लिओनी कायम चर्चेत असते . ती वेळोवेळी तिच्या फॅन्स ना तिच्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी विषीयी माहिती देत असते. अलीकडच्या काळात आपण तिला चित्रपटांमध्ये फारसा पहिला नाहीये तरीही इन्स्टाग्रामवर व ट्विटर वर तिचे राज्य आहे. याचेच एक उद्धरण म्हणजे काही दिवसानपूर्वी एक रेस्टॉरेंटमध्ये गेल्याचे फोटोज् सोशल मीडियावर तिने पोस्ट केला होता व या पोस्टवर तिच्या फॅन्स ने कमेंटसाचा अक्षरशः पाऊस पडला होता.

 

 

सानी ला मराठी गाण्यावर नाचताना पाहताना अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतील हे मात्र नक्की !!

Leave a Reply

Your email address will not be published.