Spruha Joshi soon to be seen in remake of this south film

Spruha Joshi

अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमुळे प्रसिद्ध झालेली स्पृहा जोशी लवकरच दाक्षिणात्य सिनेमात झळकणार असे म्हटले जात आहे.आजपर्यंत तिने केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘बायोस्कोप’,‘मोरया’, ‘अ पेइंग घोस्ट’, ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ या गाजलेल्या चित्रपटांमध्येही तिची लक्षवेधी भूमिका होती. विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून केलेल्या दमदार अभिनयामुळे तिने स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग बनवला आहे .काहीदिवसांपूर्वी ती दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार ही बातमी तिने ट्वीट तिच्या फॅन्सना दिली होती आणि त्यासोबत तिने एक फोटोदेखील पोस्ट केला होता. या फोटोतील तिचा लूक दाक्षिणात्य चित्रपटातील आहे आसा अंदाज येत आहे.

पण सूत्रांच्या माहिती नुसार ती ‘चार्ली’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या ‘देवा’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी मराठीतील अनेक कलाकार दाक्षिणात्य चित्रपटात सध्या खूप चांगली कामगिरी केली आहे. नेहा पेंडसे, श्रुती मराठे, सय्याजी शिंदे यांसारख्या कलाकारांनी तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केले आहे. विशेष म्हणजे सय्याजी शिंदे यांनी तर दक्षिणेतील अनेक भाषांमध्ये काम केले आहे व तेथील महत्त्वाच्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव आहे. या कलाकारानंच्या पाऊलावर पाऊल ठेवत स्पृहा जोशी दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे.

मराठी चित्रपटात आपली एक ओळख बनवल्यानंतर आता स्पृहा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणार आहे. या सिनेमाचे नाव किंवा सिनेमात स्पृहाची भूमिका या बाबत माहिती अजून सांगण्यात आलेली नाही. पण स्पृहा तिच्या कसदार अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवरदेखील राज्य करणार हे नक्की.
स्पृहाने यासांदर्भात जो ट्विट केले होते तो तिने काही कारणांमुळे डिलीट केला आहे. स्पृहा कायम तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या आगामी चित्रपताविषय माहिती देत असते.त्यामुळेच तिचे आणि तिच्या फॅन्स चे अनोखे नाते तयार झाले आहे. यावेळीही नेहमीप्रमाणे स्पृहाने या आगामी चित्रपटाविषयी माहिती फॅन्स ना मिळावी म्हणून एक ट्विट केले होते. पण चित्रपटासंबंधीची कोणतीही माहिती इतक्यात देण्याची परवानगी नसल्याने तिने हा ट्विट डिलीट केला.

स्पृहाच्या या नवीन वाटचाली साठी अनेक शुबेच्छा !!

Leave a Reply

Your email address will not be published.