Sprha Joshi’s husband Varad Laghate will be seen in this movie.

Varad Laghate 02

 

दर्जेदार अभिनयामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी–हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यां निधन झाले. पण त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत.

 

‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून,रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषिकेश जोशी यांनी केले आहे.
या चित्रपटअभिनेत्री स्पृहा जोशी महत्वाची भूमिका साकारत आहते. विशेष म्हणजे या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटातील ‘इकडून तिकडे’ या गाण्यात तो दिसणार आहे नुकतेच हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

 

Varad Laghate 01

 

‘इकडून तिकडे’ हे गाणे अजय गोगवले यांनी गायले आहे. हे गाणे स्पृहा जोशी हिच्यावर चित्रित झाले असून यात वरदचा गेस्ट अपिअरन्स आहे. स्पृहा आपल्या पती वरदच्या पदार्पणाविषयी सांगते, “वरद नेहमी मला आणि माझ्या फिल्म मेकर्सना मस्करीत सांगतो की मला एक गेस्ट अपिअरन्स करायचा आहे. ‘इकडून तिकडे’च्या चित्रीकरणावेळी वरद मला भेटायला सेटवर आला होता. हृषिकेशने वरदला एक छोटासा अपिअरन्स करशील का, अशी विनंती केली आणि वरदचा डेब्यू झाला.”
नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.