Sonalee Kulkarni’s upcoming movie Vicky Velingkar.

Vickey Velingkar 02

अभनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा हिरकणी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धम्माल करत आहे. लवकरच तिचा अजून एक चित्रपट येत असून ‘विक्की वेलिंगकर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!’ अशा आशयाचं ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचं ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्याता आला आहे. कॉमिक बुक आर्टिस्ट अशी प्रमुख व्यक्तिरेखा असून या व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट आहे . ती सध्या बेरोजगार असून आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे.

 

या चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी त्यांची खात्री आहे . या पूर्वी त्यांनी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘७ अवर्स टू गो’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात आपण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याना प्रमुख भूमिका साकारताना पाहणार आहोत.
या सोबत आपण स्पृहा जोशी, संग्राम समेळ, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी या कलाकारांना देखील महत्तवपूर्ण भुमीकेत पाहणार आहोत.

 

सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.