Smita Tambe will be seen in this Bollywood Movie.

अभिनेत्री स्मिता तांबे यांनी त्यांच्या उत्तम अभिनयामुळे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जोगवा, ७२-माईल, परतु, देऊळ यासारख्या विविध मराठी चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी चित्रपटासोबतच त्यानी हिंदीतदेखील त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आणि आता
लवकरच आपण त्यांना कंगना राणौतसोबत पाहणार आहोत. कंगना यांच्या आगामी पंगा या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे दिसणार आहे.

 

smita tambe 01

 

‘पंगा’ हा चित्रपट कबड्डी खेळावर आधारीत आहे. कंगना राणौत ‘पंगा’ मध्ये एका कबड्डी खेळाडूची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे. कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी कंगना वजन देखील वाढवले आहे. कंगना आणि स्मिताशिवाय यात नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

 

smita tambe 02

 

स्केक्रेट गेम्स २नंतर स्मिता पुन्हा एकदा वेबसिरीजमध्ये सुद्धा झळकणार आहे. ‘हवा बदले हसू’ या वेबसिरीजमध्ये स्मिता आरतीची भूमिका साकारणार आहे. आरती ही पर्यावरण शास्त्रात पी.एच. डी करत असून दिवसा ती पेट्रोल पंपवर काम करत असते. ही एक विज्ञान-पर्यावरणपूरक थ्रिलर सिरिज आहे. ‘सावट’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे.