Smita Tambe and her husband make their own Eco friendly Ganesha.

काही वर्षा पूर्वी ‘ट्रि-गणेशा’ हि संकल्पना आली , ज्यामुळे गणपती विसर्जन नंतर देखील बाप्पा रोपट्याचा स्वरूपात आपलय सोबत राहणार असा नवीन उपक्रम सुरु झाला. यंदा अभिनेत्री स्मिता तांबे ने स्वहस्ते ‘ट्रि-गणेशा’ बनवूनइको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. सात दिवस अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी गणेशोत्सव साजरा होतो. गणेशापाठोपाठच गौरींचेही आगमन होते. अभिनेत्री स्मिता तांबे हिने तिला मिळालेल्या सर्व भूमिका उत्तमरीत्या पार पडल्या आणि ती तितकेच मन लावून ती आपल्या लाडक्या बाप्पाचे आपल्या घरी आगत-स्वागत करते.

 

Smita Tambe ganesh 01

बाहेरून मूर्ती विकत न घेता घरच्याघरी गणपतीची मुर्ती घडवून तिचा साजशृंगार करणे स्वहस्ते नैवेद्य बनवणे पूजा करणे या सर्व गोष्टींवर स्मिताचा भर असतो.
स्मिता तांबे गणेश आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात ती आणि तिचे यजमान गणेशोत्सवाच्या अगोदर आठ दिवसांपासून तयारीला सुरूवात करतात . तिचे पती गणेशाची मुर्ती घडवतात व स्मिता मुर्तीला रंग रंगोटी आभुषणे-वस्त्र हे सर्व करते. शाडू मातीची मुर्ती ते घडवतात व या मूर्तीला घडवताना मुर्तीमध्ये बियाणं टाकतात. या मुर्ती चे घरीच कुंडीत विसर्जीत करतात आणि विसर्जनानंतरही बाप्पाचा आशिर्वाद त्या नव्या उगवलेल्या रोपाच्या रूपात त्याच्या सोबत कायमचा राहतो.

 

Smita Tambe ganesh 02

 

विशेष म्हणजे हि संकल्पना जेव्हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींना जेव्हा समजली तेव्हा त्यांनी त्यांच्या घरच्या गणेशोत्सवासाठी मुर्ती बनवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आता त्यांच्या घरच्या गणपतीशिवाय गणेशोत्सवाच्या अगोदर जवळ-जवळ सात ते आठ गणेश मुर्ती ते बनवतो.गणेशोत्सवा हा स्मितासाठी खूप महत्वाचा असून या काळात ती नाटकाचे प्रयोग किंवा शुटिंग करत नाही. वर्षातून एकदा बाप्पा घरी येतो. तर त्याच्यासाठी घर स्वच्छ करण्यापासून, ते त्याचे कपडे बनवणे. त्याच्यासाठी नैवेद्याचे जेवण घरी बनवणे आणि गौराईचेही आगत-स्वागत करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्मिता ला स्वत:ला करायला खूप आवडतात.