Siya Patil Will Be Seen In An Upcoming Women Centric Movie

Siyaa Patil

‘गर्भ’ या आगामी स्त्रीप्रधान चित्रपटात सिया पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. या आधी सियाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गर्भ’ या चित्रपटामध्ये मध्ये सियाने कविता हि व्यक्तिरेखा संस्कारली आहे. या चित्रपटामध्ये तिने एका स्त्रीचा संपूर्ण प्रवास रेखाटला आहे. या चित्रपटाच्या कथानकात कविता हि साधी सरळ, मेहनती स्त्री कॉलेजमध्ये प्रेमात पडते. पुढे या प्रेमाचे रूपांतर नात्या मधे त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, कविताला अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो. मुलगी, पत्नी, आई, सून अशा विविध नात्यातील महिलांची महत्वाची भूमिका पहायला मिळणार आहेत.

आपल्या आयुष्यात एकदा तरी आव्हानात्मक भूमिका करावी अशी प्रत्येक कलाकाराची अपेक्षा असते. काही कलाकारानं अशा भूमिका सहज मिळतात तर काहींना काहीजणांना त्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. अभिनेत्री सिया पाटील लवकरच अश्या एक आव्हानात्मक भूमिकेत आपल्याला दिसणार आहे . ‘गर्भ’ असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे . ‘गर्भ’ या कौटुंबिकपटाची निर्मिती ‘श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस्’ निर्मिती संस्थेच्या राजेंद्र आटोळे यांनी केली आहे . कर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. या चित्रपटाची दिग्दर्शन सुभाष घोरपडे यांनी केले आहे. रमेश तिवारी यांनी या कथेचे लेखन केले आहे .

या चित्रपटामध्ये सिया पाटील सोबत सुशांत शेलार, निशिगंधा वाड, अनंत जोग, यतीन कार्येकर, वंदना वाकनीस, पल्लवी वैद्य हे कलाकार असणार आहेत.
‘गर्भ’ चित्रपटातून आरजे दिलीप हे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.

स्रियांच्या आयुष्यातील संवेदनशील वाटचाल मांडणारा ‘गर्भ’ हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.