Shivani Surve to be seen in these upcoming movies.

बिग बॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरात फायनॅलिस्ट ठरलेली शिवानी लवकरच मोठ्या पद्यवार झळकणार आहे .शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालुच राहताना दिसणार आहे.

 

Shivani Surve 01

 

अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने गेल्या दहा वर्षा अनेक मालिका केल्या तसेच बिग बॉस मराठी या रिएलिटी शो मुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. टेलिव्हिजन जगात आपले नाव कामवाल्या नंतर ती आता सिनेरसिकांवरही आपली मोहिनी घालायला येणार आहे.येत्या ऑक्टोबर महिन्यात शिवानी सुर्वेचे दोन मोठे सिनेमे रिलीज होत आहेत. अंकुश चौधरीसोबतचा ट्रिपल सीट आणि हेमंत ढोमे लिखीत-दिग्दर्शित सातारचा सलमान हे दोन्ही सिनेमे ऑक्टोबर महिन्यातच सिनेसरसिकांच्या भेटीला येत आहेत. शिवानीच्या फॅन्स साठी ही नक्कीच डबल गुड न्यूज आहे.

 

Shivani Surve 02

या आधी २०१६ ला शिवानीचा घंटा हा चित्रपट आला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी ती रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तिच्या दोन फिल्म्स रिलीज होत आहेत. 11 ऑक्टोबरला सातारचा सलमान तर ट्रिपल सीट हा चित्रपट 24 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.