Shivani Baokar to be seen in upcoming serial ‘Alti Palti’

Shivani Baokar 01

 

फार कमी वेळेत प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘लागीरं झालं जी’. ‘लागीरं झालं जी’ या मालिकेमुळे आज्या आणि शीतली ही जोडी अवघ्या माहाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या दोन्ही कलाकाराने त्यांच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्यदेखील केलं. या कारणामुळे जेव्हा ही मालिका बंद झाली त्यावेळी अनेक फॅन्स निराश व दुःखी झाला होता. या मालिकेतील कलाकार पुन्हा कोणत्या स्वरूपात आपल्या समोर येणार यांचे ते आतुरतेने वाट पाहत आहेत. असा असताना आता शीतल अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

‘लागीरं झालं जी’ या मालिकेत शीतल हि भूमिका साकारणारी अभिनेत्री पुन्हा नवीन मालिकेतून आपल्या भेटीस येणार या गोष्टीचा प्रेक्षकांना खूप आनंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झी मराठीवरील आगामी ‘आलटी पालटी’ या मालिकेमध्ये शिवानी झळकणार आहे . तसेच या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे. या मालिकेत तीने ठगाची भूमिका रंगवली आहे असे म्हटले जात आहे.

 

या भूमिकेविषयी बोलताना शिवानी म्हणाली कि तिला अभिनयाची प्रचंड आवड आहे. माध्यम कोणतेही असले तरी ती उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न करते. शितल या भूमिकेमुळे तिला काम करण्याची संधी मिळाली व या भूमिकेने तिला समाधान व प्रसिद्धीही मिळवून दिली. आगामी भूमिका हि फार वेगळी असून तिला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न ती करणार आहे. बेधडक बिंधास्तपणा आणि अस्खलित सातारी बोली असणारी शितल आता आगामी मालिकेत नेमकी कशी असले या कडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. शिवानीची भूमिका नेमकी कशी असेल आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.