Shiv and Veena’s first Tik-Tok Video
बिग बॉस मराठी चे दुसरे पर्व गाजवणारी जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप . या दोघांची जोडी या पर्वातील सर्वात लोकप्रिय जोडी होती . या दोघांमधी मैत्री आणि प्रेम हे खरं कि खोटं असा प्रश्न सर्व रसिक प्रेक्षकांना पडला होता. इतकाच काय तर बिग बॉस संपल्यावर हे दोघे एकत्र राहतील कि नाही अशी शंका सगळ्यांना होती. वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्यांनी अजूनही एकत्र राहून त्यांच्या प्रेमाची खात्री सर्वाना करून दिली आहे. नुकताच त्यांचा पहिला टिक-टॉक व्हिडिओ पोस्ट केला.
या व्हिडिओला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसत आहे . ‘प्यार तुझे करता हूँ देख मेरे आँखों में’ या गाण्याच्या माध्यमातून शिव वीणा प्रती आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. ‘बिग-बॉस’च्या घरात त्यांच्यात प्रेमाचं गुलाब फुललं आणि ते गुलाब बिग-बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अधिक बहरत असल्याचे दिसत आहे.
शिव आणि वीणा सध्या ‘कश्मीर की वादियां’ एन्जॉय करताना दिसत आहेत. हे दोघे नेहमी एकमेंकासोबत फिरताना करताना दिसतात. बिग-बॉसच्या घरातील त्यांचं प्रेम हे टीआरपीसाठी असल्याचा सर्वांचा समाज त्यांनी खोटा असल्याचे सर्वांना दाखवून दिले आहे. सध्या हे प्रेमी युगूल कश्मीरमध्ये एन्जॉय करत आहे.
इतकाच नाही तर शिवच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वीणा त्याला एक गोड भेट दिली होती. तिने स्वत:च्या हातावर शिवच्या नावचा टॉटू काढला होता. त्यानंतर शिवनं देखील त्याच्या हातावर वीणाच्या नावाच्या टॉटू काढला आहे. त्या दोघांमधील प्रेम दिवसागणिक वाढत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.