See Photos of Prarthana Behere’s Destination Wedding

Prarthana Destination Wedding 07

 

आपली लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आता झाली आहे सौ. प्रार्थना अभिषेक जावकर. अनेक मराठी चित्रपट करणारी प्रार्थना मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. प्रार्थना आणि अभिषेक जावकर यांचा हा विवाहसोहळा डेस्टिनेशन वेडिंग असल्यानं गोव्यात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.

 

११ नोव्हेंबर ला प्रार्थना व तिचे कुटुंबीय गोव्याला रवाना झाले. त्यानंतर प्रार्थना- अभिषेकचं गोव्यात तीन दिवसांचं ‘डेस्टिनेशन वेडिंग’ जोरदार पार पडले. त्यापूर्वी प्रार्थनाच्या मूळ गावी बडोद्या येथे लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले. प्रसिद्ध हिंदी व मराठी चित्रपट अभिनेता वैभव तत्ववादी हा प्रार्थना खूपच चांगला मित्र असल्यानं त्यांनं आपल्या मैत्रिणीच्या लग्नात धम्माल मजामस्ती केली. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न असा तीन दिवसांचा हा भरगच्च सोहळा होता. अभिनेत्री प्रिया मराठे, सोनाली कुलकर्णी आणि इतर मित्र-मैत्रिणींनी प्रार्थना अन् अभिषेक यांच्या या डेस्टिनेशन वेडिंग मध्ये हजार होते . लग्नसोहळा संपल्यानंतर एका धमाल कॉकटेल पार्टी आयोजित करण्यात आली होती.

 

अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले असून, तो तेथे यशस्वीही ठरला. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलीये. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही त्यानेच केले. जवळपास दोन वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. ‘डब्बा ऐस पैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केलीये. ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तो आता दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनात गुंतल्याचे समजते. प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यांच्या लग्नातील काह खास क्षण.

 

Prarthana Destination Wedding 08

 

Prarthana Destination Wedding 01

Prarthana Destination Wedding 02

Prarthana Destination Wedding 09

Prarthana Destination Wedding 10

Prarthana Destination Wedding 03

Prarthana Destination Wedding 04

Prarthana Destination Wedding 05

Prarthana Destination Wedding 06