Did you see the new look of Sonalee Kulkarni

Sonalee hampi look 02

‘हंपी’ या आगामी चित्रपटात पोस्टरगर्ल सोनाली कुलकर्णी एका भन्नाट नवीन लूकमध्ये पाहायला मिळते. तिचा हा नवा हटके लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रत्येक चित्रपटात आपल्या नवीन लूकमध्ये पाहायला मिळते. काही दिवसं पूर्वी हंपी’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता मात्र यामध्ये सोनाली दिसली नव्हती पण त्यानंतर तिचा या चितपटातील खास लुक प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांना तो आवडला आहे.

 

Sonalee hampi look 01

 

सोनाली कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हंपी’ चा पोस्टर पोस्ट केला आहे. हा पोस्टर पाहताच तिच्या चाहत्यांना- ‘ही सोनालीच आहे ना’ असा प्रश्न पडला. या पोस्टरमधला सोनालीचा लूक पाहून सगळेच अवाक झालेत. पोस्टरमध्ये सोनालीने बॉब कट हेअर स्टाईल स्टाईलमध्ये दिसत आहे. तिच्या केसांचा रंगही गोल्डन ब्राऊनिश आहे. सोनालीने लाल रंगाचा प्रिटेड टॉप आणि ब्लू जिन्स घातली आहे. या पोस्टरमध्ये सोनाली पार्टी मूडमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. सोनालीचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोला सोनालीने – ‘चला माझ्यासोबत हंपीच्या प्रवासाला’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोवर चाहत्यांनी सोनालीला तुला ओळखलच नाही अशी प्रतिक्रीया देखील दिली आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये सोनालीचा चष्मा घातलेला स्मार्ट लूक पाहायला मिळत आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता ललित प्रभाकरने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हंपी’ चे एक पोस्टर पोस्ट केले आहे. यामध्ये सोनाली फोटो काढताना दिसत आहे.

 

Sonalee hampi look 03

 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटासाठी सोनालीने आपलं वजन आणि केस वाढवले होते. या सिनेमात लग्न होऊन पाच-सहा वर्ष झालेल्या दाम्पत्यांची भूमिका करायची असल्यामुळे तिने आपले वजन आणि केस दोन्ही वाढवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोनाली आपल्याला न्यू अवतारमध्ये पाहायला मिळत आहे. तिचा हा नवा हटके लूक सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.