Sairat fame Rinku Rajguru assaulted by a fan

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘सैराट’ मुळे रिंकू राजगुरु हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.रिंकूला या पहिल्याच चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे . या चित्रपटानंतर तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली की, ती जिथे जाईल तिथे तिचा लोक पाठलाग करतात. आसा असल्यामुळे तिला एक-दोन वेळा धक्काबुकीच्या घटनांना सामोरा जाव लागला होता.
संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी ‘सैराट’ फेम अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिचे राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात लाखो चाहते आहेत.आर्चीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते काहीही करू शकतात. सोलापूरमधील अकलूजला एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने रिंकूची छेड काढल्याची घटना समोर आली असून, या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Rinku Solapur 01

रिंकू राजगुरु हिची छेड काढल्याप्रकरणी दत्तात्रेय गरत या तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे. सोलापूर येथील अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर आरोपी ठाण्याचा रहिवासी असल्याचे कळते. तसेच कलम ३५४ (ड) अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे.माळशिरस येथील दिवाणी न्यायालयात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, रिंकू सध्या दहावीची परीक्षा देत असून ती लवकरच ‘सैराट’च्या कन्नड रिमेकमध्ये झळकणार आहे.

‘सैराट’च्या कन्नड रिमेक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर ला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे ,ट्रेलर पाहिल्यानंतर रिंकू पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावणार, हे नक्कीच. ‘मनसु मल्लिगे’ मध्ये मराठी ‘सैराट’ चे संगीत काही बदल न करता तसंच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा सैराट चा अनुभव घेणार आहेत. काही दिवसांपुर्वी ‘सैराट’च्या कन्नड व्हर्जनमधील झिंगाटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. भाषा कळत नसली तरी त्यातील भावनांनी लोकांना ठेका धरायला भाग पाडले होते. सैराट’च्या कन्नड रिमेक ‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश यांनी केली आहे. ‘सैराट’च्या कन्नड भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने विकत घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत. सूत्रांच्या माहिती नुसार लवकरच ‘सैराट’चा हिंदी रिमेक सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.