Sai Tamhankar soon to be seen in Tamil movie ‘Solo’

Sai tamhankar Solo

 

मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार सई ताम्हणकर लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. मराठी चित्रपटसृतीतील दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे या सारख्या अनेक चित्रपटातून आपण तिला पहिले आहे. उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. इतकाच नाही तर गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर तिचा हि नवीन वाटचाल नक्कीच यशस्वी होईल असं म्हणणे चुकेचे ठरणार नाही. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

बिजोय नामदार दिग्दर्शित सोलो हा चित्रपट रोमँटिक थ्रिलर आहे. या चित्रपटात डलकर सलमानची मुख्य भूमिका आहे. त्याचप्रमाणे डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत.कोचिन, मुंबई व लोणावळा या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. साई ताम्हणकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी माहिती स्वतः सईने सोशल मीडियावर दिली. तिने तिच्या या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले. या चित्रपटातील भूमिकेबाबत माहिती सध्या गुप्ता ठेवण्यात आली आहे. सई ला तिच्या या नवीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुबेच्छा.

 

नक्की पहा या चित्रपटाची हि पहिली वाहिली झलक.