Sai Tamhankar, Lalit Prabhakar, Parn Pethe to star in upcoming movie Medium Spicy.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. उत्तम अभिनयामुळे सईने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही विशेष स्थान प्राप्त केले आहे. तिच्या या नावलौकिकामुळे तिच्या फॅन्स ची संख्यादेखील अफाट आहे. ती नेहिमीच सोशल मीडिया वर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते व सगळ्या गोष्टीचे माहिती शेर करीत असते. नुकताच तिने तिच्या आगामी चित्रपटाची माहितीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शेर केली आहे. लवकरच सई ‘मीडियम Spicy’ हा चित्रपट येत आहे.

 

Medium Spice 02

 

 

‘मीडियम Spicy’ या आगामी चित्रपटामध्ये सईसोबत ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सईने तिच्या सोशल मीडिया अकॉउंट वर या चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच तिने मीडियम Spicy”. दोन टोकांचा मध्य साधणारी गोष्ट ! असे कॅप्शन या फोटो ला दिले आहे.

 

 

Medium Spice 01

 

‘मीडियम Spicy’ हि विधि कासलीवाल यांची निर्मिती असून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. या सोबतच काही दिवसासिनी सई चा पाँडेचेरी हा चित्रपट हि येत आहे. या चित्रपटात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. एक कौटुंबिक विषयावर आधारित या चित्रपटाची कथा सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी लिहिली आहे.