Sai Tamhankar is back on social media.

अभिनेत्री सई ताम्हणकर हीच फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. याच बरोबर ती कायम सोशल मीडिया वारून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ती शेर करते. पण मागील काही दिवसांपासून ती सोशल मीडियापासून दूर होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेच. तर आनांदाची बातमी हि , कि सई आता सोशल मीडियावर परत आली आहे.

 

Sai tamhankar 02

 

मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री अर्थात सई ताम्हणकर. दुनियादारी, बालक पालक , जाऊंद्याना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटात तिने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अर्थात फेब्रुवारी महिन्यात सईने ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याची बातमी तिच्या फॅन्स ला दिली होती.या दरम्यान ती पाँडेचरी येथे सचिन कुंडलकर यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती. नुकतीच ती मुंबई येथे परत आली असून ती सोशल मीडियवरही परतली आहे. सोशल मीडियवर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केले.

सई ताम्हणकर परत आल्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधला ज्यात तिने सांगितले कि, ती पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही परत आली आहे . या सोशल मीडिया डिटॉक्सचा तिला शुटिंगसाठी खूप फायदा झाला. परंतु रोजच्या रोज चाहत्यांशी संपर्कात असण्याची सवय असल्याने त्यांना तिने खूप मिस केले. या एका महिन्यात तिने जी काही धम्माल मज्जा मस्ती केली ते लवकरच ती तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करणार आहे.