Sagarika Ghatge’s upcoming Marathi movie ‘Daav’

Sagarika Ghatge new marathi movie

सागरिका घाटगे पुन्हा एकदा मराठी चित्रपटत काम करणार असून ‘डाव’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. ‘चक दे’ हा तिचा हिंदी मधील गाजलेला चित्रपट. मराठी चित्रपटसृष्टीत या आधी सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट या चित्रपटात सागरिका घाटगे ने प्रमुख भूमिका साकारली होती. सागरिका घाटगेसह अतुल कुलकर्णी यांना रोमँटिक भूमिकेत आपण चित्रपटात पाहिलं. आता पुन्हा एकदा हि अभिनेत्री प्रेक्षकांसमोर ‘डाव’ या चित्रपटातून येणार त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

अलीकडच्या काळात सागरिका तिच्या चित्रपटांपेक्षा झहीरसह असलेल्या अफेअरमुळे सर्वत्र चर्चेत होती. या दोघांची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंड मुळे झाली. त्यानंतर दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते.या नंतर दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती खुद्द झहीरने ट्विटरवरुन त्याच्या चाहत्यांना दिली होती. ट्विटर वर साखरपुड्याचा एक फोटो त्याने शेर केला होता व त्यासोबत ”बायकोच्या चॉईसवर कधीही हसू नका.तुम्हीही तिचीच चॉईस असता.पार्टनरर्स फॉर लाईफ असे त्यांनी ट्वीट केले होते.”

मराठी चित्रपटसृष्टीत ‘डाव’ हा सागरीकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे. ‘डाव’ हा चित्रपट नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सची निर्मिती असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे.संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.हा चित्रपट मराठी रसिकांना सायको किलिंगचा अनुभव देणार आहे .डावमध्ये सागरीकाने मुख्य भूमिका साकारली असून, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे असे तिने सांगितले. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून,’डाव’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिकाने सांगितले. डाव हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.