Rinku Rajguru’s parents soon to be seen in this movie

Rinku with her mom dad 01

सैराट म्हटलं कि तुमच्या डोळ्या सामोरे येईल आर्ची आणि परश्या .आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या चित्रपटामुळे खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले तसेच रिंकू ने साकारलेल्या या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं. वास्तिवक पाहता रिंकू ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सामान्य मुलगी होती. दिग्दर्शक नागराज मुंजुळे यांनी तिला तिच्या गावी पहिले व तिची निवड या चित्रपटीच्या प्रमुख भूमिकेसाठी केली. रिंकू ने तिच्या या भूमिकेसाठी भरपूर मेहेनत घेतली. तिच्या उत्तम अभिनयामुळे तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केवळ एवढेच नव्हे तर तिला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

 

सैराट या चित्रपटाने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले व सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर तिने सैराटचाच दाक्षिणात्य रेमके मनसु मल्लिगे या चित्रपटातून हीच भूमिका परत साकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच रिंकू मकरंद माने यांच्या मराठी चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे काम सुरु असून विशेष म्हणजे रिंकूचे आई-वडील देखील या चित्रपटात झळकणार आहेत. रिंकू च्या कुटुंबाने या आधी कधीही चित्रपटसृष्टीत कोणतेही काम केले नाही.

 

Rinku with her mom dad 03

 

रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन साताऱ्याच्या गणेश शिंदे यांनी त्यांच्या साई सिने फिल्म्स निर्मितीसंस्थे अंतर्गत केले आहे. अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसंच, मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.