Rinku Rajguru to be seen in this Web series .

‘सैराट’ चित्रपटातील प्रेक्षकांचं मन जिकणारी अरची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. लवकरच रिंकु राजगुरू एका डिजिटल वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. रिंकु राजगुरूने हिंदी सिरीजमध्ये पदार्पण केलं असून मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. खुद्द रिंकुने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या बाबत माहिती शेअर केली आहे.

Rinku in hindi 01

ताहिर शब्बीर हि सिरिज बनावट असून या आधी ताहिर ने ‘बेपनाह’ आणि ‘निशा और उसके कझिन्स’ मध्ये आपल्या अभिनयाची कमल दाखवली आहे तर आता दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ताहिर हॉटस्टार वर ‘100’ नावाची वेब सिरीज करत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये रिंकु राजगुरू काम करत आहे.

 

Rinku in hindi 02

ताहिरच्या रॅट फिल्म या बॅनर अंतर्गंत इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरे दिसणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकु राजगुरू यामध्ये खूप महत्वाचा भूमिका साकात आहे. तसेच या वेब सिरीजमध्ये ताहिर आणि फोर मोअर शॉर्टस फेम राजीव सिध्दार्थ हे कलाकार झळकणार आहेत. अलीकडे ताहिर नेटफ्लिक्स वरील गिल्टी आणि वूटवरील लॉ ऍण्ड ऑनर या वेब सिरीजमध्ये दिसला आहे. नेमकी रिंकू ची भूमिका काय आणि तिच्या अभिनयाची जादू या सिरिज मध्ये कशी चालते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल !!