Raghav Swapnil Joshi’S Son Debuts In This Advertise .

स्वप्नील जोशी म्हणजे मराठातील सुरस्टार . त्याने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले . सध्या आपण पाहतो मराठी सिनेसृष्टीत स्टार किड्स देखील या क्षेत्रात पदार्पण करत आहेत . असे असताना आता आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या मुलगा देखील सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. मराठीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा स्वप्नील जोशी याचा मुलगा राघव आता आपल्याला कमर्शिअल जाहिरातीत झळकणार आहे.

 

 

नुकतेच या संबंधित पोस्ट अभिनेता स्वप्नील जोशी यांनी त्याचा सोशल मीडिया अकाउंट वर शेर केली आहे. त्याने शेर केलेल्या विडिओ सोबत स्वप्नील ने असे लिहिले आहे ,” मला नेहमीच माझ्या दोन्ही मुलांच्या स्किन केयरसाठी सौम्य गोष्टीचा वापर करायचा होता. नुकतच “न्यू जॉन्सन” च्या प्रोडक्टबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासूनच राघवसाठी टाॅप टू टो वाॅश आणि बेबी लोशन हे प्रोडक्ट वापरत आलो आहोत आणि अर्थातच त्यांच्या संपूर्ण प्रॉडक्टची श्रेणी उत्तम असल्यामुळे तसेच जॉन्सन चे सगळे प्रोडक्ट हे हानीकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे 5.5 लाख लोक जागतिक स्तरावर याचा वापर करतात. हेच ‘न्यू जॉन्सन’ च्या प्रोडक्टस् ला पूर्णतः अग्रगण्य सिद्ध करत असल्याने आम्ही देखील राघवसाठी @johnsonsbabyindia चीच निवड केली.”

 

 

राघव जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या जाहिरातीत झळकणार आहे. ही जाहिरात ५ सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अशापद्धतीने बाळ स्वप्नील जोशीने देखील आपली एन्ट्री केली आहे.