Priya Bapat’s first ever camping experience..

प्रत्येक माणसाची आयुष्यात काही स्वप्ने असतात. असेच एक स्वप्न म्हणजे कॅम्पिंग करणे. आपण एकदातरी कॅम्पिंगचा अनुभव घ्यावा असे प्रत्येकाला वाटते . निसर्गाच्या सानिद्यात मोकळ्या आकाशाखालीं एका तंबू मध्ये राहण्याचा अनुभव काही वेगेलाच असतो . सुंदर नदीकिनारीं लावलेला तंबू ,तंबूभोवती घडणारी धमाल , कैम्पफायर व रात्रीच्यावेळी दिसणारे मनमोहक चंद्र तारे. या सगळ्या गोष्टी एक विलक्षण आनंद देणाऱ्या असतात असाच आनंद सद्या आपल्या लाडक्या अभिनेत्री प्रिया बापट हिच्या आयुष्यात आला आहे .

प्रियाने नुकताच social media वर तिचा कॅम्पिंगचा विडिओ टाकला आहे . या विडिओ मध्ये ती असा सांगते कि हा तिचा पाहिलंच कॅम्पिंगचा अनुभव आहे. डाउकी नावाच्या गावातील एका नदीकिनारी त्यांचा हा कॅम्प असल्याचे ती सांगते. या विडिओ मध्ये ती तिचा टेन्ट आपल्याला दाखवते व ती रात्री तिकडे राहणार आहे असेही सांगते. हा कॅम्प एन्जॉय करण्यासाठी ती खूपच उत्साही आहे असे सुद्धा ती सांगते. या विडिओ मधून तिचा आनंदी आणि उत्साही आपल्याला दिसतो.

तिने अपलोड केलेल्या या कॅम्पिंग व्हिडिओला भरभरून पसंती मिळाली असल्याचे दिसत आहे.  प्रियाने हि धमाल ट्रीप कशा पध्दतीने एन्जॉय केली या संधर्भात तिने एक फोटोचा कोलाज असलेला व्हिडीओ देखील अपलोड केला आहे. ती तिच्या एका पोस्टच्या माध्यमातून असेही सांगते की तिने मेघालयची ही ट्रीप खूप एन्जॉय केली आहे. तिला या ट्रीपच्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकलाय मिळालाय असे हि ती सांगते या कॅम्पमधील सॅमी या व्यक्तीचे विशष आभारदेखील तिने मानले आहे. प्रियाने तिच्या पोस्टमध्य तिचा हा कॅम्पिंग अविस्मरणीय असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

Priya Bapat Camping

[envira-gallery id=”820″]

त्याचबरोबर तिने एक पोस्ट ही अपलोड केली आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते की, मेघालयची ही ट्रीप खरचं खूप एन्जॉय केली आहे. या ट्रीपच्या माध्यमातून मी साहसी खेळाचा अनुभव ही घेतला आहे. त्याचप्रमाणे या ट्रीपच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले आहे. मला छान संधी दिल्याबद्दल तिने सॅमी या व्यक्तीचे आभारदेखील मानले आहे. तसेच माझ्यासाठी ही ट्रीप अविस्मरणीय असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. प्रिया बापट व अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा नुकतीच वजनदार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता . व या चित्रपटासाठी प्रियाने तब्बल तेरा किलो वजन वाढविले होते. त्यामुळे या चित्रपटासाठी तिचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. वजनदार या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली असुन या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील यश मिळविले. सचिन कुंडलकर यांनी वजनदार चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते . लावरकच प्रिया पिंपळ या आगामी चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.