Pratharna Behre shared her engagement photo

Prarthana Behere engagement 01

 

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि विवाह बद्ध होणार असलयाचे काही दिवसान पूर्वी समजलं होते. नुकताच तिने तिच्या साखरपुड्याचा फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केलाय. प्रार्थना बेहरे हि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. कॉफी आणि बरंच काही, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, मि अँड मिसेस सदाचारी या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

 

‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमातील तिची जाई ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. त्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्याही वाढलीये. फुगे या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना भरपूर आवडली. नुकताच तिचा दिग्दर्शक अभिषेक जावकरसोबत साखरपुडा झाला असून प्रार्थनाने आपल्या साखरपुड्याचा फोटो आवर्जून सोशल नेटवर्किंग साईट वर शेअर केलाय. आम्ही एकमेकांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतलाय, असं कॅप्शन देखील या फोटोसोबत तिने लिहिलंय.

 

प्रार्थनाचा होणारा नवरा अभिषेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध वितरक आहे. त्याने डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम या सिनेमांची सहनिर्मिती केलीये. तसेच काही सिनेमांचे दिग्दर्शनही केलय. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटाची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.